शुन्य - Moved to Marathi Section

15 1 0
                                    

सोडुन तू जातांना, मला शून्यावर आणुन ठेवले
मान्य भूतकाळातील चुका, पण तुझ्यावरच नव्याने प्रेम केले

आजच्या प्रेमाची किम्मत विसरून, तु भूतकाळातच डोकावले
तुझ्या आनंदात आनंद मानुन, मी मुकाट तुझ्या, आयुष्यातुन गेले

सर्वांना समजुन घेणारा तू, मला सतत, अग्नी परीक्षेस बसविले

का भेदभाव केलास, फक्त माझ्याचशी
कारण तुला पक्के ठाऊक होते, तुच सुख दुःखात, माझी कुशी

तुच सांग तुझ्याशिवाय, मी जगू , किंवा मरू तरी कशी
रात्र रात्र जागून असते, तू येऊन तर बघ, माझी ओली उशी

अश्रूंचे बांध मज कडुन, थांबता थांबेना
पुढल्या जन्मी कसा माझाच होशील, याचे व्रत देखील मिळेना

कुठले पुण्य करू मी,  कुणाला साकडे घालू, मार्ग मला कळेना
विरहात तुझ्या जळाले शरीराने जरी, हृदय जळता जळे ना

सोडुन तू जातांना, मला शून्यावर आणुन ठेवले
तुझ्यावर प्रेम करून, मी असे कोणते पाप केले?

#SwapnilThakur
15th January 2023

Nadaniya...Dil KiWhere stories live. Discover now