वलय - प्रकरण ५

149 0 0
                                    


थोड्या वेळानंतर रागिणीने बेडवर अंग टाकले. कपाळावर हात ठेवून ती छताकडे बघत बसली.

स्क्रिप्ट वाचता वाचता बराच वेळ निघून गेला पण आता तिला पुन्हा तो फोन कॉल आठवू लागला. झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप काही केल्या येत नव्हती. डोळ्यात गुंगी साठत होती होती पण अनेकविध विचारांनी झोप येत नव्हती...

... तिचे कान काचांच्या फुटण्याच्या आवाजाने भरून गेले.

रोहनचा भीषण अपघात तिला आठवला...

तिचे जीवनातले पहिले प्रेम - रोहन राठी!

दिल्लीतल्या मॉडर्न कॉलेजमधले त्या दोघांचे मॉडर्न प्रेम!

आणि तिला आठवला तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा तिच्या कॉलेजातला राहुल गुप्ता ज्याचा आता फोन आला होता.

रोहन आणि तिने एकत्र पाहिलेली स्वप्ने!

तिला कॉलेज जीवनापासूनच अॅक्टींगचे वेड होते...

दृष्ट लागेल असे जन्मजात सौंदर्य तिला लाभलेले होते आणि ते तिने तरुणपणी आवडीने जपले आणि टिकवले आणि वाढवले होते.

तिचे व्यक्तिमत्व सुद्धा सळसळते आणि उत्साही होते, म्हणून ते सौंदर्य आणखी खुलून दिसायचे.

तिचा चेहरा खूपच बोलका होता.

मनातील अगदी कोणतीही भावना तिच्या चेहऱ्यावर लगेच दिसून यायची. तिचा चेहेरा लगेच लालसर व्हायचा.

त्यात भर म्हणून तिला अभिनय करण्याची आवड होती. कॉलेजात अनेक नाटकांतून तिने भाग घेऊन वाहवा मिळवली होती. कॉलेज संपले की तिला मुंबईला यायचे होते. थोडक्यात तिचे अभिनय क्षेत्रातले भविष्य उज्वल होते हे नक्की!

रोहनने तिला तिच्या करियर निवडीची मोकळीक दिली होती. त्याला लंडन मध्ये MBA करून नंतर मॅनेजमेंट मध्ये करियर करायचे होते.

तिचे वडिल दिल्लीतल्या उच्चभ्रू वर्तुळात उठबस असणारे श्रीमंत बिझिनेसमॅन आणि रोहन एका प्रायव्हेट कॉलेज मधल्या प्रोफेसरचा मुलगा!

वलय (कादंबरी)Where stories live. Discover now