वलय - प्रकरण ३

182 0 0
                                    


सुप्रिया राजेशला ड्रॉप करून सिद्धिविनायकनगरला "लीएरा विमेन्स हॉस्टेल" वर पोहोचली. ते एक "सेल्फ कुकिंगची" सोय असलेले वर्किंग विमेन्स होस्टेल होते. तिच्या दोन रूममेट्स होत्या. सोनी बनकर आणि रागिणी राठोड. सुप्रियाने चावीने रूम उघडली. कॉमन किचन, हॉल आणि तीन स्वतंत्र बेडरूम, बाथरूम अशी रचना होती त्यांच्या रूमची! तिने आपली पर्स ड्रेसिंग टेबलवर ठेवली आणि आरशात पाहिले. चेहरा बराच काळवंडलेला वाटत होता. सोनी आली असेल असा विचार करून तिने सोनीच्या बेडरूमवर टकटक केले. आतून स्त्रीचा एक अवखळ आवाज आला, "कम ऑन इन सूप्री! डोअर इज ओपन!"

सुप्रियाने दरवाजा ढकलला तेव्हा सोनी बनकर तिच्या बेडवर अस्ताव्यस्त पाय फैलावून पहुडलेली होती. तिच्या कानात हेडफोन होता आणि अंगावर फक्त एक बारीक सफेद टी शर्ट आणि पँटी होती. सोनी बोलण्यात, वागण्यात आणि कपडे घालण्यात खूप अघळपघळ आणि मोकळी होती! सोनीचा चेहरा लांबूळका होता. तिची अंगकाठी भरीव आणि गोलसर होती. तिच्या चेहेऱ्यावर नेहमी एक बेपर्वाईची आणि उच्छृंखलतेची छटा असायची. डोळे चमकदार आणि बोलके होते. नाक सरळ आणि उठावदार होते.

"सोनी मॅडम, आराम चाल्लाय? जेवणाचं काय ठरवलंय आज रात्रीचं?"

"साकेत सोबत जाणार आहे मी बाहेर जेवायला."

"वा! मज्जा चाल्लीये मस्त. बाॅयफ्रेंड सोबत! अगं, रागिणी आली नाही अजून?"

सोनी हसायला लागली, "ती? आजपर्यंत आलीय का कधी वेळेवर ती परत? भटकत असते ती इकडे तिकडे रात्री बेरात्री! पण आज रात्री कसलीतरी शूटिंग आहे म्हणाली होती ती, त्यामुळे उशिरा घरी येईल ती!"

"शूटिंग आहे तेही खरंच आहे म्हणा! पण एरवी शूटिंग नसली तरी ही पोरगी रात्रीची बाहेर फिरतच असते. काय करत असते देव जाणे! एनिवे! मी राईस बनवते आहे. मग फक्त माझ्या एकटीसाठीच बनवते!"

"बिंदास बनव आणि खा! आपलंच हॉस्टेल आहे. आपलीच रूम आहे. आपलंच राज्य आहे! एंजाॅय!"

तेवढ्यात सोनीचा मोबाईल वाजला. ती बोलू लागली, "हां रे साकेत. आ रही हूँ! .. तैय्यार तो होने दे मुझे!...हां बाबा हां, तेरी पसंद का पिंक कलर पहन के आती हूँ ... क्या? खाना खाने के बाद पब मे भी चलना है? ठिक है...सेक्सी कपडे पहनके आती हूँ....हां रे! कम कपडे पहनने है, तो तैय्यार होने में ज्यादा समय लगता है! तुम साले जेन्ट्स लोग इस बात को नही समझोगे!", एक डोळा मिचकावत स्वतःच्या जोकवर ती हसली.

वलय (कादंबरी)Where stories live. Discover now