मस्त विनोद.............
तात्यासाहेब:-बाळू काल तुझ्याबरोबर होती ती तुझी नातेवाईक आहे का?
बाळू:- होय ती माझी लांबची बहिण आहे.
तात्यासाहेब:-लांबची म्हणजे?
बाळू:-आम्ही एकूण १४ भावंड आहोत.
मी सर्वात मोठा आणि ती सर्वात लहान.
मग लांबची नव्हे का.......... 5/5/07 Pr@$@d...
एकदा गणिताचे शिक्षक वर्गात शिकवत असतात.
बंडू तु सांग "मी तुला १० गोळ्या दिल्या"
त्यातल्या ३ तू रोहिणीला दिल्यास ,
३ विजयाला दिल्यास अणि
४ स्मिताला दिल्यास तर
तुला काय मिळेल??
बंडू:- सर मला ३ मैत्रिणी मिळतील........ 5/5/07 Pr@$@d...
एक अनोखी प्रेमकहाणी!
नायकाचं नायिकेवर प्रेम आहे. नायिकेच मात्र खलनायकावर प्रेम आहे. पण खलनायकाच नायकाच्या बहिणीवर प्रेम आहे. नायकाच्या बहिणीच मात्र नायिकेच्या भावावर प्रेम आहे. पण, नायिकेच्या भावाच खलनायकाच्या बहिणीवर प्रेम आहे. खलनायकाच्या बहिणीच नायकाच्या भावावर प्रेम आहे. पण नायकाच्या भावाच नायिकेच्या बहिणीवर प्रेम आहे. नायिकेच्या बहिणीच मात्र नायकावर प्रेम आहे.
... या भानगडीत शेवटी २ माणसं आत्महत्या करतात. ते कोण?
सांगा! सांगा!...
... नाही जमत?
... अहो निर्माता आणि दिग्दर्शक!!!
