लग्नाचा वाढदिवस

3.6K 0 0
                                    

लग्नाचा वाढदिवस..

सकाळपासून स्नेहल गडबडीत होती. आज नाश्त्याला डोसे करायचे होते. सकाळची कामे, मुलांची तयारी, चैतन्यची धावपळ.. शेवटी सगळे जमले टेबलवर. मुलं खायला लागली.. डोसे आणि गुलाबजामही.. खुशीत होती. आई-बाबाही बसले. चैतन्य आला..

"आज काय आहे गं नाश्त्याला, लवकर दे... कॉल आहे मला. बापरे, डोसे आणि गुलाबजाम. सकाळ सकाळ नको गं इतक heavy देत जाऊस... एकच जाम घेतो.. "

स्नेहलचा चेहरा खर्रकन उतरला...

चेतन, मुलं पटपट घराबाहेर पडली. तीही तिचं आवरून ऑफिसला पोचली. ती एक Chartered Accountant होती. एका मोठ्या कंपनीत consultant म्हणून जात होती. केबीन मधे पोचल्यावर उदास अशी बसून राहिली.

आज २३ सप्टेंबर... त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस!!! चेतनच्या लक्षातही नव्हत... भूतकाळात शिरायला वेळ लागला नाही तिला... १० वर्षांपूर्वी त्यांची भेट झाली... तिच्या आत्येभावाचा मित्र होता तो. ओळख झाली, प्रेम जमले, घरी सांगितले.. सगळंच सुरळीत झाल. एकमेकांना पूरकच होते ते. मनं जुळली होती. लग्न करायचा निर्णय घेतला होता. चेतन तेव्हा एका software company मधे नोकरीला होता. पण त्याची स्वप्न मोठी होती. त्याला स्वत:चा व्यवसाय करायचा होता. स्नेहल नुकतीच CA झाली होती आणि एका Audit Firm मधे काम पाहात होती. तेव्हाच चेतनला USA ला जायची संधी आली २ वर्षांसाठी. ती त्याने घ्यायचे ठरवले. स्नेहलची साथ होतीच. मग लग्न करूनच जायचे ठरले. काढीव मुहूर्तावर धामधूमीत लग्न झाले.

US चे दिवस मंतरलेलेच होते. project नवीन, देश नवीन आणि लग्नही.. सगळ्याचीच मजा.. project च्या खाचाखोचा, गोरे PM आणि colleagues , नव्या देशाच्या रीती, हवा आणि लग्नाची नवलाई.. वर्ष कस सरलं कळलं नाही. दुसर्‍या वर्षी ते settle झाले होते, चेतनही त्याचे contacts develop करायला लागला होता. त्याला business मधे त्याची मदत झाली असती. तीही थोडा अभ्यास करून ज्ञान update करत होती.

US चा stay संपवून ते परत आले. मग मात्र दिवसांना चाकं लागली. चेतननी नोकरी सोडली, स्वत:चं ऑफिस सुरु केल. US चे चांगले clients होते. नवीन setup , भरपूर कष्ट यात चेतन बुडून गेला. स्नेहा ची साथ होतीच. तिच्या commercial knowledge चा त्यांना उपयोग झाला. सुरुवातीचं administration स्नेहानी बघीतल. मग आदित्यची चाहूल लागल्यानंतर तिनी काम कमी केल. ऑफिस settle झालं होतच. staff ही चेतनला चांगला लाभला होता. ती घरात बिझी झाली. आदित्य नंतर दोन वर्षातच पालवी झाली आणि स्नेहा पुरती अडकली. चेतनची बाहेर धावपळ आणि स्नेहाची घरात! पैसा भरपूर मिळत होता. घरची परिस्थिती चांगली होतीच.

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Nov 24, 2008 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

लग्नाचा वाढदिवसWhere stories live. Discover now